Ad will apear here
Next
‘महिंद्रा’ची इलेक्ट्रिक व्हेइकल केरळमध्ये दाखल
कोचीन : महिंद्रा लॉजिस्टिक्स (एमएलएल) या भारतातील थ्रीपीएल सेवा देणाऱ्या एका सर्वात मोठ्या कंपनीने केरळमधील कर्मचारी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) समावेश केला आहे. ही वाहने महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.ची ईव्हेरिटो मॉडेल्स असून, ती फ्लीट सेग्मेंटसाठी पसंतीची ‘ईव्ही’ आहेत व कर्मचारी वाहतुकीसाठी राज्यात प्रथमच दाखल केली जाणार आहेत.

‘एमएलएल’ने बंगळुरू, दिल्ली अशा शहरांत आपल्या ग्राहकांसाठी ‘ईव्ही’ अगोदरच दाखल केली आहेत आणि आगामी आर्थिक वर्षात पीपल ट्रान्सपोर्टेशन सोल्यूशन्स (पीटीएस) व्यवसायाचा भाग म्हणून १५० वाहने वापरण्याचे नियोजन आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘आमच्या दृष्टीने इलेक्ट्रिक व्हेइकल्स म्हणजे महिंद्रा समूहाच्या फ्युचर ऑफ मोबिलिटी या उद्देशाचे प्रतिक आहेत. जगभरातील ग्राहकांसाठी वाहतुकीचे माध्यम उपलब्ध करेल, अशी शाश्वत ऑटोमोटिव्ह व्यवस्था. महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये आम्ही पर्यावरणपूरक उपाय स्वीकारण्याची गरज असल्याचे मानतो आणि आमचे व्यवसाय त्यानुसार चालवले जातात. या वाहनांद्वारे आम्ही केरळमध्ये प्रवेश करत आहोत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहोत.’

महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही जवळजवळ दशकभर इलेक्ट्रिक वाहतुकीची चळवळ उभारत आहोत. २०१६पासून केरळ ही आमच्यासाठी उदयोन्मुख बाजारपेठ ठरली आहे आणि आज महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून ईव्हेरिटो ही फ्लीट सेग्मेंटमध्ये दाखल होत आहे, ही आनंदाची बाब आहे. ‘ईव्हीं’चा अवलंब करण्याचे परिवर्तन घडून येण्यासाठी फ्लीट सेग्मेंट चालना देईल, असे आम्हाला वाटते. शाश्वत जगणे, या राज्याच्या उद्दिष्टामध्ये, या निर्णयामुळे मोठे योगदान दिले जाईल, असा विश्वास आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZNHBS
Similar Posts
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘झूमकार’तर्फे ‘इटूओ-प्लस’ ऑफर पुणे : महिंद्रा उद्योग समुहातील ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘झूमकार’ यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्याची घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची ५० वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘झूमकार’ यांचा सहयोग नवी दिल्ली : महिंद्रा समूहाचा भाग असलेली ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची ‘झूमकार’ यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ‘ईव्ही’ देण्याची विशेष सेवा राजधानी दिल्लीमध्येही उपलब्ध केल्याचे नुकतेच जाहीर केले.
‘सेल्फ-ड्राइव्ह ईव्ही’साठी ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’चा सहयोग मुंबई : महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची झूमकार यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ‘ईव्ही’ देण्याच्या विशेष सेवेमध्ये करून देशातील एका सर्वात महत्त्वाच्या व्यवसाय केंद्रामध्ये ही सेवा उपलब्ध केल्याचे जाहीर केले आहे.
‘महिंद्रा लॉजिस्टिक्स’च्या उत्पन्नात वाढ मुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) या थ्रीपीएल सोल्यूशन देणाऱ्या भारतातील एका सर्वात मोठ्या कंपनीने ३१ मार्च २०१८पर्यंतच्या तिमाहीतील व आर्थिक वर्षातील एकत्रित आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language